पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गस्त घालणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिघांविरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्यात दोन डिलिव्हरी बॉय आणि एका सेल्समनचा समावेश आहे.

तक्रारदार हे वनराई पोलीस ठाण्यात काम करतात. सोमवारी ते गस्त करत होते. रात्री साडेअकरा वाजता तीन जण विनाहेल्मेट मोटरसायकल चालवत होते. हा प्रकार तक्रारदार यांच्या लक्षात आला. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांना अडवून दंडात्मक कारवाई केली. तेव्हा तिघांनी तक्रारदार यांच्याशी हुज्जत घातली. तसेच त्यांच्या अंगावर धावून गेले. सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करता, याची माहिती वनराई पोलीस ठाण्याला कळवण्यात आले. तेव्हा पोलिसांचे पथक तेथे आले.