
विधि तीन आणि पाच वर्षे अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील फेरीसाठी पसंतीक्रम भरण्यास सीईटी सेलकडून 11 ऑगस्टपर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. काही विधि महाविद्यालये बार काैन्सिल ऑफ इंडियाची मान्यता, तसेच संबंधित विद्यापीठाची संलग्नता मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे सीएपी फेरीसाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक महाविद्यालयांचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.






























































