
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या रॅलीत DJ वर नाचताना धक्काबुक्की झाल्याने एकाची हत्या तर एक जखमी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरातील आंबेडकर पुतळ्या जवळ घडली. रविकांत टेम्बुलकर (३६) असं मृत व्यक्तीचं नाव असून तो शहरातील इंदिरा नगर परिसरात राहणारा आहे. या घटनेत अनिकेत गलबले हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर मधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था कडून गांधी चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रॅली काढण्यात आली होती. रॅलीत DJ वर नाचताना काही जणांमध्ये धक्काबुक्कीवरून वाद झाला. रविकांत हा वाद सोडायला गेला असता त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. त्याला तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रेहांत पठाण (१९) शेख जिशान (२२) चेतन सोनवणे (३१) बादल भैसरे (१९) यासील शेख (३२) अशी आरोपींची नावं असून एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

































































