सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची सखोल चौकशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, पाच वर्षांतील देणग्यांची तपासणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामधील देणगी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सिद्धिविनायकाला गेल्या पाच वर्षात आलेल्या देणग्या आणि दानपेटीत आलेले दान हा तपासाचा केंद्रबिंदू असणार आहे.

अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील चोरीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतूनही दरवर्षी 18 कोटी रुपये गायब होत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पाच वर्षांतील देणगी संकलन आणि आर्थिक नोंदी तपासल्या जाणार आहेत.

सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत. शासनाने मंदिर न्यासाच्या उच्चपदस्थ अधिकाऱयांना यासंदर्भातील अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.