
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाच्या नावाखाली रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. मात्र सहा महिने उलटूनही काम संथ गतीने सुरू असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काम अपुरे असल्याने ट्रफिक आणि पॉवर ब्लॉकला आता पुन्हा 21 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार गाडी क्र. 22120 मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दादरपर्यंत चालविण्यात येणार आहे. तर गाडी क्र. 12134 मंगळुरू-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच चालवण्यात येणार आहे. या शिवाय गाडी क्र. 12810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, गाडी क्र. 12112 अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाडय़ांचा प्रवास सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात समाप्त करण्यात येणार आहे.































































