इंग्लंड उपांत्य फेरीत जात नसतो – वीरू

अफगाणिस्तानसारख्या संघाने गत जगज्जेत्या इंग्लंडवर खळबळजनक विजय मिळवीत यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. तरीही इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने ‘इंग्लंड वर्ल्ड कप सेमी फायनल खेळणार’ असा आत्मविश्वास ट्विटरवर व्यक्त केला. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर वॉन चांगलाच ट्रोल होतोय. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही वॉनची फिरकी घेतली. इंग्लंड यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत जात नसतो, अशी पोस्ट करून त्याने वॉनचीही खिल्ली उडवली.

सलाम अफगाणिस्तान – रवी शास्त्री 

गत जगज्जेत्या इंग्लंडवर धक्कादायक विजय मिळविणाऱ्या अफगाणिस्तान संघाची टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी तोंडभरून काwतुक केले. ‘‘सलाम अफगाणिस्तान! क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा ऐतिहासिक विजय तुम्ही साकारलाय. तुम्ही आज दाखवून दिले की जो चांगले प्रदर्शन करेल, तोच संघ जिंकत असतो. या विजयाने अफगाणी क्रिकेटपटूंबद्दलचा आदर आणखी वाढला आहे,’’ असे ट्विट रवी शास्त्री यांनी केले असून त्यांचे हे ट्विट सध्या खूप व्हायरल होत आहे.

मैदानावर नमाज अदा करणाऱ्या रिझवानविरुद्ध तक्रार 

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने पाकिस्तान-नेदरलॅण्ड्स लढतीदरम्यान मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी याविरोधात आयसीसीमध्ये तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा करणे हे खेळाच्या विरोधात आहे, असे जिंदाल यांनी आपल्या तक्रारीत लिहिले आहे. विनीत जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अँकर झैन अब्बास हिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या वेळी विनीत जिंदाल म्हणाले होते की, झैन अब्बास यांनी आपल्या ट्विटने हिंदुस्थान आणि हिंदू धर्माला दुखावले आहे. यानंतर झैन अब्बासला हिंदुस्थान सोडावा लागला होता. मात्र मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2021च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानविरुद्धच्या लढतीदरम्यान मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज अदा केली होती.