Chandrapur News – पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी दिली भेट, व्यथा ऐकून न घेतल्याने शेतकऱ्याचे भर चौकात ठिय्या आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आज जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर असताना तुमसरमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला. तुमसर येथील खापा चौकात शेतकऱ्यांनी नष्ट झालेल्या धानाची पेंडी हातात घेत पालकमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता पालकमंत्री भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन निघून गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी खापा चौकातच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आपली व्यथा ऐकून घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, मात्र कार्यकर्त्यांना भेटायला वेळ आहे,” असा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बळजबरीने ताब्यात घेतले. या घटनेमुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.