
देशभरात जेन-झी, तरुण, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, दलित आणि महिलांसह विविध घटक आपल्या हक्कांसाठी लढा देत असून अनेकदा हे लढे एकट्याने लढले जात आहेत. प्रत्येक संघर्षाची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. मात्र, एकाकी पडलेला आवाज अनेकदा दबून जातो. याच पार्श्वभूमीवर या सर्व स्वतंत्र आवाजांना बळ देण्यासाठी एकाच व्यासपीठावर आणि एकाच नकाशावर एकत्र आणण्यासाठी ‘सत्याग्रह’ नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, अशी घोषणा लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. सत्य हेच सर्वात मोठे हत्यार असल्याचे महात्मा गांधींनी आपल्याला शिकवले असून, त्याहूनही मोठे शस्त्र म्हणजे सत्याच्या बाजूने एकत्र उभे राहणे होय, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
देशभर में लोग अपने हक़ के लिए लड़ रहे हैं – और अक्सर अकेले लड़ रहे हैं।
Gen Z, छात्र, किसान, आदिवासी, दलित, महिलाएँ – हर संघर्ष की अपनी कहानी है। पर जो आवाज़ अकेली उठती है, वो अक्सर दब जाती है।
‘सत्याग्रह’ इन्हीं आवाज़ों को एक नक्शे पर साथ लाने की पहल है।
बापू ने यही सिखाया था… pic.twitter.com/X8jUwnyLBO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 3, 2026
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीले की, जर देशातील कोणतीही व्यक्ती किंवा घटक कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देत असेल, तर आपली कहाणी (http://rahulgandhi.in/satyagraha)` या लिंकवर पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी फक्त दोन मिनिटे लागणार असून, तुमची कहाणी या विशेष नकाशावर झळकणार आहे, जेणेकरून आपल्यासारखे इतर कोण-कोण अन्यायाविरुद्ध लढत आहेत, याची माहिती मिळू शकेल. विरोधी पक्षनेते या नात्याने माझी ही मोठी जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत राहुल गांधींनी सांगितले की, संसदेत असो, रस्त्यावर असो, पत्र लिहून असो किंवा जिथे माझी गरज भासेल, जिथे जे काही जसे शक्य होईल, तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शक्य ते सर्व करीन, असे म्हणत नागरिकांना आपल्या सत्याग्रहाची कहाणी शेअर करण्याचे आवाहन याद्वारे केले आहे.

























































