Asian Games 2026 – फायनलमध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवत हिंदुस्थानने जिंकले सुवर्णपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. फायनलमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानता धुव्वा उडवत सुवर्णपदक जिंकले आहे. सामन्यात हिंदुस्थानने ६ गडी गमवत २११ धावा केल्या होत्या. हिंदुस्थानच्या गोलंदाजांच्या अचुक माऱ्यामुळे पाकिस्तानचा संघ १९२ धावाच करू शकला. आणि हिंदुस्थानचा १९ धवांनी मोठा विजय झाला. निशिनमधील कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना झाला. आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने हे १९वे सुवर्णपदक जिंकले.

टी-२० सामन्यात हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी करत ६ बाद २११ धावांचे आव्हान पाकिस्तान समोर ठेवले. हिंदुस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक वर्मा यांनी तुफानी सुरुवात केली. हिंदुस्थानकडून अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी दमदार फलंदाजी केली. अभिषेक वर्माने सर्वाधिक ६८ धावा केल्या. तर तिलक वर्माने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ ६ बाद १९२ धावा करू शकला. पाकिस्तानकडून हसन नवाजने सर्वाधिक ९६ धावा केल्या.