
शेअर बाजाराने सलग सहाव्या दिवशी गटांगळी खाल्ली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 493, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 133 अंकांनी कोसळले. इराण युद्ध सध्या थांबले असले तरीही चर्चेतून कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा मंदावली. कच्च्या तेलाच्या दरातील वाढदेखील घसरणीस कारणीभूत ठरली.



























































