
मनमाडमध्ये गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघातानंतर आग लागली. आगीमुळे ट्रकमधील गॅस सिलिंडरचे एकामागोमाग एक स्फोट झाले. शनिवारी दुपारच्या सुमारास पुणे-इंदूर महामार्गावर ही घटना घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अपघातानंतर गॅस सिलिंडर रॉकेटसारखे हवेत उडत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हायड्रोनच गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला दुपारच्या सुमारास अपघात झाला. अपघातावेळी ट्रकमध्ये 200 गॅस सिलिंडर होते. अपघातामुळे ट्रकला भीषण आग लागली आणि ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. त्यामुळे पुणे -इंदूर महामार्गांवरील काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास मनमाडजवळ पुणे-इंदौर महामार्गावर घडली. pic.twitter.com/LA7nZjz77g
— Saamana (@SaamanaOnline) October 8, 2022
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. भीषण आग आणि सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळे येत आहेत. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

































































