नगर शहरात युवकावर मध्यरात्री गोळीबार; परिसरात खळबळ

नगर शहरातील मध्यवर्ती भागात एका युवकावर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने नगरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात कायदा- सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. शहरात मध्यरात्रीच्या सुमारस शेख नावाच्या युवकावर गोळीबार करण्यात आला. त्यात तो जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना राज चेंबर परिसरामध्ये घडलेली आहे. घटनेमागचे नेमके कारण समजलेले नाही. या घटनेची पोलीस चौकशी करत आहे. तोफखाना ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरमध्ये याआधाही अशीच घटना घडली होती. नगर शहरामध्ये पुन्हा असा प्रकार घडल्यामुळे कायदा संस्थेच्या प्रश्नाबाबत आता तोच उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणीही होत आहे.