
गद्दार खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दमदाटी करत शिवीगाळ केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली.
खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसैनिकांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून पाटील यांना अटक करण्याची मागणी केली. त्याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी पत्रकार संजय पाटील यांच्या घराबाहेर आले होते. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांना दमदाटी करत शिवीगाळ केली.
”इज्जत देतोय इज्जतीत रहा. आता माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला येऊ नका, नाहीतर मारून पाठवणार. हे सगळं रेकॉर्ड करा आणि कमिश्नरला पाठवा. पुन्हा विचारलात तर मार खाल. पोलिसांसमोर सांगतोय. यापुढे तुम्हाला इथे उभं नाही करणार”, अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिली.
संजय पाटील भरकटलेत – सुनील राऊत
संजय दिना पाटील एवढा काही मोठा नेता नाही. त्यांचा विषय आमच्या पक्षासाठी संपलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर चर्चा करून त्यांना प्रसिद्धी कशाला द्यायची. ज्यांचा इतिहासच अतिरेकी असेल तर ते काहीही करू शकतात. माझ्या मते ते थोडे भरकटलेले आहेत. पक्ष सोडल्याने त्यांच्यावर परिणाम झालाय. ईशान्य मुंबईची सीट भाजप कधी सोडणार नाही. त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असे सुनील राऊत म्हणाले.






























































