मिठी नदी प्रकल्पासाठी 21 कोटींच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मिठी पॅकेज 4’ बोगदा प्रकल्पाचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होऊ शकलेले नाही. असे असताना पुन्हा मुदतवाढ देत जीएसटीच्या नावाखाली प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 21.03 कोटी रुपयांची घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर आला. बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव आज मंजूर करण्यात आला. ‘मिठी पॅकेज 4’ अंतर्गत बापट नाला आणि सफेद पूल नाला या भागातील सांडपाणी मिठी नदीत मिसळण्यापासून रोखण्यासाठी बोगदा बांधण्यात येणार आहे.