
चेंबूरमध्ये 30 जून रोजी स्पूल बसवर पिंपळाचे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची आता ‘थर्ड पार्टी’ चौकशी होणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी पुलगुरू वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. संजय देशमुख यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.
दरम्यान, पालिकेने नेमलेल्या समितीच्या अहवालात उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आल्याने महापौर रितू तावडे आणि विरोधकांनी हा अहवाल फेटाळला होता. त्यामुळे आता या दुर्घटनेची फेरचौकशी होणार आहे.
चेंबूर परिसरातील डायमंड उद्यानाजवळ 30 जून रोजी स्पूल बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत विहान श्रीवास्तव (11) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार पंत्राटदार आणि सल्लागाराला तुटपुंजा दंड आकारण्यात आला होता.
पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण होणार
डॉ. संजय देशमुख आपल्या चौकशीत प्राथमिक चौकशी समितीने वापरलेल्या कार्यपद्धतीचे परीक्षण, सादर केलेल्या पुराव्यांचे स्वतंत्र विश्लेषण, अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण शास्त्र, जलनिःसारण, मलनिःसारण, रस्ता बांधणी, हवामान, मृदाशास्त्र व सार्वजनिक प्रशासन या दृष्टिकोनातून प्राथमिक चौकशी अहवालाचे चिकित्सक मूल्यमापन करणार असून भविष्यातील धोरणात्मक सुधारणाही सुचवणार आहेत.































































