विद्यार्थी गुणगौरव सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शाखा क्र. 217 च्या वतीने यशस्वी भव विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना लॅपटॉप, कराओके माईक, हेडफोन, स्पीकर, एअरबड्स, पेनड्राइव्ह तसेच वह्यांचे वाटप करण्यात आले.

शाखाप्रमुख शशिकांत पवार व शाखा संघटक रिया चेंदवणकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, भैरूलाल जैन, जयश्री बळ्ळीकर, सुरेखा उबाळे, शिवाजी रहाणे, गजानन भोसले, विनोद लोटलीकर, प्रथमेश सकपाळ, अलकेश मैत्री, सिद्धेश जगताप, प्रशांत धनावडे, शुभदा कोळी, धनश्री डूबळे, श्रुती बागले, आदित्य देवकर, हर्षवर्धन हांडे आदी उपस्थित होते.