अँटिलिया, मनसुख हिरेन प्रकरणात वाझेची भूमिका महत्त्वाची; एनआयएची जामीन रद्द करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची भूमिका महत्त्वाची होती व त्यांनी संपूर्ण कट आधीच आखला होता त्यामुळे वाझेचा जामीन रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर केली.

एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग व ऍड. चिंतन शहा यांनी वाझेच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला. वाझेने अतिशय थंड डोक्याने हे दहशतवादी कृत्य केले असून, हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून मनसुख हिरेनची हत्या घडवून आणली. वाझेने स्फोटकांनी भरलेली कार उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ भरवस्तीत पार्क केली होती. तसेच एका आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाच्या आडून धमकी देणारे पत्रही त्या कारमध्ये ठेवले होते. यावरून केवळ अंबानी कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण समाजात दहशत माजवण्याचा वाझेचा मुख्य हेतू होता, असा दावा केला.