Ratnagiri News – अल्पवयीन विद्यार्थिनीला बसमधून उतरवल्याचा आरोप; वडिलांनी दाखल केली तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड-मंडणगड मार्गावरील एसटी बसमधील प्रकारामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याचा आरोप करत तिच्या वडिलांनी रत्नागिरी विभागीय एसटी प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, २७ जुलै रोजी बसमध्ये गर्दी असताना एका अनोळखी प्रवाशाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने हा प्रकार वाहकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने तिच्याकडे दुर्लक्ष करून दमदाटी करत चिंचवळी फाटा येथे बसमधून उतरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनीचे वडील चंद्रकांत मोहिते यांनी केली आहे.