रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 14 लाखांची बेहिशोबी रोकड जप्त

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुसज्ज मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील 1 हजार 942 मतदान केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, शौचालय, रॅम्प आणि फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीत मतदान वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवलीमध्ये 10 लाखांची रोकड आणि सावंतवाडीमध्ये 4 लाखांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण मतदार संघात 16 लाख 300 लीटर दारु जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी 13 लाख 58 हजार 350 रुपये असल्याचे एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.देवेदर सिंह म्हणाले की, रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 14 लाख 38 हजार 471 मतदार आहेत, त्यामध्ये 7 लाख 8 हजार 487 पुरुष आणि 7 लाख 29 हजार 973 महिला मतदार आहेत. 11 मतदार तृतीयपंथी आहेत. 18 ते 19 वयोगटातील 13 हजार 763 मतदार आहेत. त्यामध्ये 7 हजार 475 युवक आणि 6 हजार 288 युवती आहेत. 7 हजार 011 हे मतदार दिव्यांग आहेत. 113 मतदार एनआरआय आहेत. 85 वयोगटातील मतदारांची संख्या 26 हजार 181 आहे. त्यामध्ये 9 हजार 862 पुरुष आणि 16 हजार 319 महिला मतदार आहेत.