
आयआयटी मुंबईत शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. याप्रकरणी आता साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला सातत्याने मानसिक त्रास आणि जातीवाचक शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करत डीन शिरीष केदारे आणि प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्या अटकेची मागणी त्यांनी केली. साहिल वाकोडे याने वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
हॉस्टेलमधील सिलिंग फॅन हटवणार
आयआयटी मुंबईच्या हॉस्टेलमधील सिलिंग फॅन हटवून त्याजागी वॉल-माऊंटेड फॅन बसवले जाणार आहेत. साहिलच्या मृत्यूनंतर हा निर्णय चर्चेत आला असला, तरी फॅन बदलण्याचा निर्णय आधीपासूनच प्रस्तावित होता, असे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे.





























































