
पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीविरोधात बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पतीचा मृतदेह सोमवारी जोगेश्वरी-राम मंदिरदरम्यान रेल्वे रुळावर आढळून आला. मृत तरुण हा पती आणि वडिलांसोबत गोरेगाव येथे राहत होता. तो वांद्रे येथे एका खासगी कंपनीत काम करत होता. सोमवारी तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या वडिलांना रेल्वे पोलिसांचा पह्न आला. त्याच्या मुलाचा अपघात झाला असून शताब्दी रुग्णालयात येण्यास सांगितले. ते नातेवाईकांसोबत शताब्दी रुग्णालयात गेले. मृताने आत्महत्येपूर्वी त्याच्या बहिणीला आणि मित्राला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला. तसेच वडिलांना काळजी घेण्यास सांगितले. त्या मेसेजमध्ये त्याने काही अनेक बाबी नमूद केल्याचे समजते. बोरिवली रेल्वे पोलिसांनी तरुणाच्या वडिलांकडे विचारपूस केली. त्यानंतर पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंद केला.






























































