अनिता उबाळे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनिता उबाळे यांचे आज पहाटे शहापूर येथे अल्पशः आजाराने निधन झाले. त्या 63 वर्षांच्या होत्या. दैनिक ‘सामना’चे वासिंद येथील वार्ताहर अविनाश उबाळे यांच्या त्या मातोश्री होत.

अनिता उबाळे या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. दुर्धर आजाराशी त्यांनी झुंज दिली. पण उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शहापूर येथील स्मशानभूमीत अनिता उबाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.