Photo – आश्चर्यकारक! दक्षिण आफ्रिकेत सापडले तब्बल 290 दशलक्ष वर्षे जुने ग्लेशियर

दक्षिण आफ्रिकेत सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत. दक्षिण आफ्रिकेत एकेकाळी हिमनदी वाहत होती, असे सांगितले तर तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. परंतु हे सत्य आहे. आफ्रिकेतील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीत असलेल्या खडकांमध्ये जगातील सर्वांत जुन्या ज्ञात हिमनदीचे अवशेष सापडले असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. जिओकेमिकल पर्स्पेक्टिव्ह लेटर्समध्ये नुकताच याचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा ग्लेशियर 290 दशलक्ष वर्षे जुना असल्याचे समोर आले आहे.

World's Ancient Glacier

हा भाग पूर्वी बर्फाच्छादित असावा आणि एक तर हा भाग पृथ्वीच्या ध्रुवांच्या जवळ असावा किंवा एखाद्या अज्ञात अति-थंड हिमकाळात, संपूर्ण पृथ्वी एखाद्या बर्फाच्या गोळ्याप्रमाणे गोठलेली असावी, अशा शक्यता या शोधामुळे समोर येत आहेत.

World's Ancient Glacier

या हिमनदीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उत्तर-पूर्व दक्षिण आफ्रिकेतील पोंगोला सुपरग्रुप सोन्याच्या खाणीतील खोल मातीचे परीक्षण केले. तपासात असे आढळून आले की जे दगड सापडले आहेत, जे पुरावे सापडले आहेत ते 320 कोटी ते 280 कोटी वर्षांचे आहेत.

World's Ancient Glacier

या हिमनदीचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी उत्तर-पूर्व दक्षिण आफ्रिकेतील पोंगोला सुपरग्रुप सोन्याच्या खाणीतील खोल मातीचे परीक्षण केले. तपासात असे आढळून आले की जे दगड सापडले आहेत, जे पुरावे सापडले आहेत ते 320 कोटी ते 280 कोटी वर्षांचे आहेत.

World's Ancient Glacier

ओरेगॉन विद्यापीठातील ज्वालामुखीय क्रियाकलाप आणि भू-रसायनशास्त्राचे जाणकार, प्रा. इल्या बिंदेमन यांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांनी सोन्याच्या खाणींमध्ये असलेला हिमनग अतिशय सुरक्षितपणे पाहिला. तसेच या खाणींमध्ये असलेले हे हिमनद्या अनेक ठिकाणी अतिशय सुरक्षित असून त्या पृथ्वीच्या निर्मितीनंतर जशा असल्या पाहिजेत तशाच आढळल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

World's Ancient Glacier

यापूर्वीही काही शास्त्रज्ञांनी या भागात प्राचीन हिमनदीचे पुरावे शोधून काढले होते. मात्र त्या माहितीच्या आधारे वय कळू शकले नाही. म्हणूनच शास्त्रज्ञांनी कपवाल क्रॅटन नावाच्या परिसरातून दगडांचे नमुने गोळा केले. ज्या सोन्याच्या खाणीतून हे दगड काढण्यात आले आहेत त्या अँग्लोगोल्ड-अशांती मायनिंग कंपनी चालवतात.

World's Ancient Glacier

हे अवशेष दर्शवतात की, हा हिमनग सुमारे 290 दशलक्ष वर्षे जुना होता. ज्या वेळी ते अस्तित्वात होते, त्या वेळी पृथ्वीभोवती फक्त बर्फच होता. त्यावेळी हरितगृह वायू नव्हते. उलट हरितगृह वायूंमुळे पृथ्वी गोठली होती. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, हा पृथ्वीवरील सर्वात जुन्या हिवाळ्यातील क्षेत्राचा पुरावा आहे.