सलमान खान गोळीबार प्रकरण; तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्या चौघांना आज अटक करून विशेष मोक्का न्यायालयात हजर केले होते. विकी गुप्ता, सागर पाल आणि अनुज थापनला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर सोनूकुमार चंदर बिष्णोईला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. पोलिसांनी विकी आणि सागरला अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी पंजाब येथून अनुज आणि सोनूकुमारला अटक केली. अनुज आणि सोनूकुमारने गोळीबारासाठी शस्त्रs पुरवली होती. या प्रकरणात पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईसह अटक केलेल्या चार आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली.