
शिवसेनेचे विधिमंडळातील पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी साकीनाका येथे मॅनहोलमध्ये व्यक्ती पडण्याची घटना दुर्दैवी असून या घटनेला महापौर आणि नगरविकास खात्याचे मंत्रई फेकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून सर्व व्यवस्थेचे चिंधडे उडाले आहेत, असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे गेल्यानंतर शहरात मॉन्सूनपुर्वीची कामे झाली नसल्याचे आम्ही सातत्याने सांगत आहोत. ते दुर्दैवाने आता खरे ठरत आहेत. शहरात नालेसफाई झालेली नाही. त्याबाबतचे अनेक फोटो येत आहेत. अंधेरी सब वे पहिल्या पावासात तुंबला, आता तुंबला आणि यापुढेही तुंबणार आहे. हिंदमाता परिसर आण्ही फ्लडफ्री केला होता. तोदेखील यांनी तुंबवून दाखवला आहे. शहरात सर्व व्यवस्थेचे यांनी चिंधडे उडवले आहेत, असे ते म्हणाले.
दोन दिवसा मॅनहोलमध्ये पडण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी महापालिकचे अधिकारी महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडले, तेव्हा त्यांच्यावरच चौकशी लावली, विचारपूस करण्याएवजी चौकशी लावणाऱ्या या पहिल्याच महापौर आहेत. या महापौरांना मुंबईकरांची नाही, तर बांगलादेशींची काळजी आहे, हे आपले दुर्दैव आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शाळेच्या बसवर झाड पडून झालेला मुलाचा मृत्यू झाला. वीजेचा शॉक बसण्याच्या घटना, मॅनहोलमध्ये पडण्याच्या घटना, शहरात पाणी साचण्याच्या समस्या आहेत. भाजपने मुंबईची बिकट स्थिती केली आहे. त्यांचे सर्व कंत्राटदार खुश आहेत. मात्र, मुंबईकरांचे हाल होत आहेत. या दुर्घटनेला महापौर जेवढ्या जबाबदार आहेत, तेवढेच नगरविकास खात्याचे मंत्री फेकनाथ मिंधेदेखील आहेत. ते आमदार, खासदार फोडण्यात, विकत घेण्यात गुंतले असतील. मात्र, त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे, असे त्यांनी सांगितले.
कंत्राटदाराकडून पैसे कसे घ्यायचे, मिळालेल्या पैशातून आमदार, खासदार विकत घ्यायचे, या त्यांच्या ऑपरेशन देवेंद्रमध्ये ते बिझी असल्याने ते मुंबईकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यासाठी ते कंत्राटदारा, अयोध्या, उज्जैन येथील मंदिरातून काढत आहेत. महापौक कारवाई करण्याऐवजी स्वतःच्याच यंत्रणेवर सशंय घेत आहेत, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.





























































