
यंदा मॉन्सून उशीरा राज्यात आणि देशात आला. मात्र, उशीराने आलेल्या मॉन्सूनने आता चांगलेच बरसायला सुरुवात केली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या जोरदार पावसाने राज्यातील अनेक धबधबे प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे आता पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. तसेच आता पावसाने जोर धरल्याने बळीराजानेही शेतीच्या कामांना जोमाने सुरुवात केली आहे.
पावसाने जोर धरल्याने आता हवामान विभागाने जुलै महिन्यासाठीचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्यात पाऊस दमदार बॅटिंग करणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीला पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
आता आठवडाभर म्हणजे २-९ तारखेपर्यंत आणि ९-१६ जुलै या काळात देशभरात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मध्य हिंदुस्थान आणि उत्तरेकडील राज्यात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
2 Jul,Ext Range Rainfall Forecast by IMD nxt 4 weeks:
2-9 & 9-16 Jul week; Good RF ovr country,with wk 1 Abve Normal rain most parts of Central India & arnd.That’s Best
16-23 Jul & 23-3 Aug;Possibility of sharp decrease in RF activity ! seen frm ERF &also frm ECMWF subseasonal FC pic.twitter.com/dyjeVZIap2— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 2, 2026
१६-२३ जुलै आणि २३ जुलै ३ ऑगस्ट या कालावधीत पावसाच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. ERF आणि ECMWF च्या ‘सब-सीझनल’ (हंगाम-अंतर्गत) अंदाजांवरून या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. हवामान खात्याने याआधीच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. आता जारी केलेल्या अंदाजवरूनही जुलै महिन्यात दमदार पवासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.





























































