‘डोसा-इडली’ गाण्यावरून वाद, चेन्नईची बंगळुरू संघाविरुद्ध तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर वाद उफाळून आला आहे. चेन्नईने ‘बीसीसीआय’कडे बंगळुरूच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार 5 एप्रिलला बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान घडला. सामन्यावेळी स्टेडियममध्ये ‘डोसा, इडली, सांबार, चटणी’ अशा शब्दांचा समावेश असलेले गाणे वाजवण्यात आले.

चेन्नईचा आरोप आहे की हे गाणे त्यांच्या खेळाडू आणि संघाची खिल्ली उडवण्यासाठी मुद्दाम वाजवण्यात आले. चेन्नई संघाचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, सामान्यतः डीजे हा घरच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी असतो. मात्र, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये परिस्थिती वेगळी होती. ‘आमच्या खेळाडूंवर काही विशिष्ट टिप्पणी करण्यात आल्या. त्यामुळे आम्ही बीसीसीआयकडे पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.