ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना 436 कोटींचे नुकसान 

देशातील दिग्गज आयटी कंपनीपैकी एक असलेल्या इन्पह्सीस कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यांच्या संपत्तीत एकाच दिवशी तब्बल 436 कोटी रुपयांची घसरण झाली. भारतीय शेअर मार्केट आज सकाळी उघडताच इन्फोसीसच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळाली. अवघ्या काही सेकंदांत स्टॉक 10 टक्क्यांपर्यंत घसरला होता. इन्फोसीसची आज 112 रुपये प्रतिशेअर याप्रमाणे घसरण झाली. अक्षता मूर्ती या इन्फोसीसचे फाउंडर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी असून त्या कंपनीच्या प्रमोटर्ससुद्धा आहेत.