
आफ्रिका खंडातील माली देशात कामासाठी गेलेल्या पाच हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या भागात अल कायदा व इसिस या दहशतवादी संघटनांचा प्रभाव असून त्यांच्याकडूनच हिंदुस्थानी नागरिकांचे अपहरण झाल्याचे बोलण्यात येत आहे. या घटनेनंतर या भागातील इतर हिंदुस्थानी नागरिकांना बामाको येथे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.






























































