IPL 2026 चेन्नईविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर खेळवल्या, अजिंक्य रहाणेला 12 लाखांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने स्लो ओव्हर खेळवल्याने KKR चा कर्णधार अजिंक्य रहाणेला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलच्या यंदाच्य़ा सिझनमध्ये अद्याप कोलकाताने एकही सामना जिंकलेला नाही. मंगळवारी चेन्नई विरोधात झालेल्या सामन्यात CSKने कोलकात्याचा ३२ धावांनी पराभव केला. या पराभवासोबतच केकेआरच्या या हंगामातील सलग पराभवांची मालिका सुरूच आहे.

“चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेला दंड ठोठावण्यात आला आहे.” असे आयपीएलच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.