
स्वयम अभियान आणि वुमन वेल्फेअर फोरमच्या संयुक्त विद्यमाने 19 एप्रिल रोजी प्लास्टिक आणि ई-वेस्ट कलेक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कलेक्शनचा 50वा ड्रॉइव्ह आहे. या ड्राइव्हच्या माध्यमातून जमा केलेले प्लास्टिक आणि ई-वेस्टवर WWF संस्थेकडून पुढील प्रक्रिया करण्यात येते. स्वयम अभियान संस्थेने 17 फेब्रुवारी 2020मध्ये या अभियानाला सुरुवात केली असून ही संस्था मुंबई-2 सी वॉर्डमध्ये गेल्या 9 वर्षांपासून कार्यरत आहे. दर महिन्याच्या तिसऱया रविवारी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून या वेस्टचे संकलन केले जाते. सुरुवातीला 35 ते 40 किलो प्लास्टिक आणि ई-वेस्ट कलेक्शन जात होते. मात्र जनजागृतीनंतर आता हा आकडा दीडशे किलोवर येऊन पोहचला आहे. जान्हवी गुर्जर, पूर्वा देवधर, प्राजक्ता रानडे आणि वुमन पह्रमच्या पदाधिकारी कल्पना शिंदे, दिलीप गाडेकर, स्मिता माने यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे ड्राइव्ह अर्ध शतकाकडे पोहचले आहे.




























































