केडीएमसीतील शिवसेना गटनेता कार्यालय जनतेचा आवाज ठरेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेता कार्यालय जनतेचा आवाज ठरेल, अशी स्पष्ट ग्वाही शिवसेना सचिव, आमदार वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केली. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर गटनेते उमेश बोरगावकर यांनी वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

यावळी आमदार वरुण सरदेसाई म्हणाले, सर्व दबावांना न जुमानता शिवसेनेचे १० उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. काही उमेदवारांचा अल्प फरकाने पराभव झाला असला तरी निवडून वरुण सरदेसाई यांची ग्वाही आलेले सर्व नगरसेवक
जनतेचे प्रश्न महासभेत ठामपणे मांडतील, ते जनतेचा आवाज ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी उपनेते अल्ताफ शेख, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, तात्या माने, शहरप्रमुख बाळा परब, योगेश निमसे, नगरसेवक नीलेश खंबायत, राहुल कोट, विशाल गारवे, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, तेजश्री गायकवाड, वंदना महिले, नारायण पाटील, मीना माळवे, सुरेश पाटील, मोहन फुलोरे, योगेंद्र भोईर, गणेश नाईक, अॅड. नीरज कुमार, प्रमोद कांबळे, संजय पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधी पक्षनेता शिवसेनेचाच !

केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेते पद आमच्याच पक्षाला मिळेल, असा विश्वास वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप-शिंदे गटाच्या महायुतीवर टीका केली. ही युती केवळ कागदावर असून त्यांच्या अंतर्गत मतभेद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत असा टोला लगावला. यावेळी त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या मधुर म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षाशी गद्दारी करून खुलेआम फिरणाऱ्यांचा जनता योग्य वेळी हिशेब घेईल, असा इशारा दिला.