
देशात पेपर लीक, रद्द होणाऱ्या परीक्षा आणि रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नीट पेपर लीक प्रकरणामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशताच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. “आज या देशात मेहनतीचे फळ मिळत नसून, स्वप्ने पाहण्याची शिक्षा मिळत आहे. प्रत्येक पेपर लीक आणि रद्द झालेली परीक्षा ही केवळ सिस्टीमचे अपयश नसून, लाखो तरुणांच्या स्वप्नांवर झालेला प्रहार आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे संताप व्यक्त केला आहे.
तरुण या परिस्थितीमुळे थकले असून प्रचंड संतापले आहेत, त्यामुळे सरकार जेव्हा ऐकण्यास तयार नसेल, तेव्हा आवाज अधिक तीव्र करावा लागतो, असे राहुल गांधी म्हणाले. तरुणांच्या भविष्यासाठी आणि या अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत राहुल गांधी यांनी 17 जून रोजी राजस्थानमधील कोटा येथे ‘छात्रों की गूंज’ या महारॅलीची घोषणा केली आहे. “ही तुमच्या भविष्याची लढाई आहे आणि मी या लढ्यात तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास त्यांनी तरुणांना दिला आहे. कोटा येथून सुरू होणारा हा तरुण गर्जनेचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून सरकारला तो ऐकण्यास भाग पाडू, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी देशातील सर्व युवकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
देश के हर युवा से मेरी एक बात – आज इस देश में मेहनत का फल नहीं, सपने देखने की सज़ा मिलती है।
हर पेपर लीक, हर रद्द परीक्षा, हर अधूरी भर्ती – सिर्फ़ सिस्टम की विफलता नहीं, लाखों सपनों पर प्रहार है।
मैं जानता हूँ आप थक चुके हैं। ग़ुस्से में हैं। पर याद रखिए – जब सरकार सुनने को… pic.twitter.com/5DDromfxmR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2026


























































