
ब्रिटनमध्ये 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि मलेशियानंतर असे करणारा ब्रिटन हा जगातील चौथा देश बनला आहे. मुलांच्या भविष्याचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे, असे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन ऑस्ट्रेलिया-प्लस दृष्टिकोन तुलनेने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील लाइव्ह स्ट्रिमिंगवरदेखील निर्बंध घातले जातील. मुलांसाठी सोशल मीडिया कर्फ्यू लागू करण्याचाही सरकारचा विचार आहे.
या प्लॅटफॉर्म्सचा समावेश
टिकटॉक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, यूट्यूब, रेडिट, ट्विच, एक्स, थ्रेड्स, फेसबुक, किक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा यात समावेश आहे.
मुलांना ऑनलाइन जगात सुरक्षित ठेवणे ही सध्याच्या काळातील मोठी गोष्ट आहे. प्रत्येक पालकाला आपले मूल सुरक्षित आणि आनंदी वातावरणात मोठे व्हावे असे वाटते. सरकार पालकांच्या पाठीशी उभे राहील, असे पंतप्रधान म्हणाले.


























































