पावसाचा सरकारी मुहूर्त 23 जून, अतिवृष्टीचाही इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनने राज्यातील शेतकऱ्यांसह मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले असतानाच भारतीय हवामान विभागाने चांगली बातमी दिली आहे. राज्यात 18 ते 20 जूनच्या दरम्यान मान्सून सक्रिय होणार असून 23 ते 28 जूनच्या दरम्यान मुंबई आणि आसपासच्या किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या कालावधीत 250 ते 300 मि.मी. पावसाची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने राज्यातील मान्सूनच्या स्थितीचे सादरीकरण केले. त्यानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

15 जूनच्या स्थितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिह्यात मान्सूनचे आगमन झाले आहे.