
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे अधिकृत निवेदन दिले आहे. अरविंद सावंत यांनी सोशल मीडिया अकाऊंट X वरून निवेदनाचे पत्र पोस्ट केले आहे. तसेच ‘पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार मी लोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. ओम बिर्ला जी यांना पत्र लिहिले आहे’, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Earlier today, following the instructions of our Hon’ble Party President Shri Uddhav Thackeray Saheb I have written to the Honourable Speaker of the Lok Sabha, Shri Om Birla ji: pic.twitter.com/mR55DbHYvx
— Arvind Sawant (@AGSawant) June 16, 2026
या पोस्टमध्ये जोडण्यात आलेल्या पत्रातून पक्षाने मागणी केली आहे की, ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी. कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत’. तसेच ‘अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी’, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पक्षाने संविधानातील दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचेही स्पष्ट केले आहे.



























































