बडोदा महामार्गावर खाजगी बसची ट्रकला धडक; 6 जणांचा मृत्यू, 20 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला. हायवेवर उभ्या असलेल्या एका ट्रकला खाजगी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, जवळजवळ 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मदत पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.