मोदीजी, डोनाल्ड ट्रम्प यांना 140 कोटी देशवासियांची माफी मागायला लावा – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बुधवारी पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

अमेरिकेने एका जहजावर केलेल्या मिसाईल हल्ल्यात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाला. त्यावरून अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना चांगलेच सुनावले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तीन नागरिकांबाबत मोदींनी ट्रम्प यांना जाब विचारला पाहिजे तसेच 140 कोटी देशवासियांची माफी मागायला लावा, असे केजरीवाल म्हणाले.

जी-7 च्या बैठकीत मोदी-ट्रम्प यांचे फक्त हाय-हॅलो, गळाभेट नाही!

”पंतप्रधानजी आज तुमची फ्रान्स ट्रम्पसोबत समोरा समोर बैठक आहे. आज तुम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगा. ट्रम्प यांनी आमच्या तीन हिंदुस्थानींची मिसाईल हल्ला करून हत्या केली आहे. 140 कोटी हिंदुस्थानींचा संदेश ट्रम्प यांना द्या. भारत एक शक्तीशाली देश आहे. हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. तीन हिंदुस्थानींची ट्रम्प यांनी हत्या केली आहे. तुम्ही त्याबाबत एक ट्विट केले नाही, तुम्ही शोक व्यक्त नाही केला. तुम्ही त्यांच्या आत्मच्या शांतीसाठी प्रार्थना नाही केली. आम्हाला एका शक्तीशाली पंतप्रधानाचाी गरज आहे. आम्हाला कमजोर, गप्प राहणारा पंतप्रधान नकोय. आज तुम्हाला देशवासियांच्या मनात जो राग आहे तो ट्रम्प यांच्यापर्यंत पोहचवावा लागेल. ट्रम्प आणि अमेरिकेला स्पष्ट शब्दात इशारा द्या की आमच्या देशवासियांची माफी मागा नाहीतर आमचा देश बदला घ्यायला सक्षम आहे”, असे केजरीवाल म्हणाले.

जी-7 च्या बैठकीत मोदी-ट्रम्प यांचे फक्त हाय-हॅलो, गळाभेट नाही!

जी-7 राष्ट्रांच्या बैठकीच्या निमित्ताने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फ्रान्समध्ये भेट झाली. होर्मुझच्या समुद्रात अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते समोरासमोर आले. यावेळी दोघांनी हाय-हॅलो आणि हस्तांदोलन केले. मात्र, यावेळी दोन्ही नेत्यांची गळाभेट न झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.