
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 20 जून रोजी सकाळी 9.30 वाजता मरीन ड्राइव्ह येथील कैवल्यधाम, आयसीवायएचसी येथे विशेष योग व आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इमपॅक्ट फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात टाटा मेमोरियल रुग्णालयातील 100 कर्करुग्ण सहभागी होणार आहेत. कर्करुग्णांच्या सर्वांगीण आरोग्य व मानसिक सक्षमीकरणासाठी योगाच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.


























































