अहिल्यानगरमधील ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदांना स्थगिती 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते-खासदार व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अहिल्यानगर जिह्यातील सर्व कक्ष पदांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच विभागीय कार्यकारिणी सदस्य मुकुंद सिंगर पाटील यांच्या पदालाही स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.