
मुंबई शहर, उपनगरांमध्ये पावसाचे धुमशान सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सखल भाग जलमय झाले असून दादर स्थानकांजवळ रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उपनगरातील मुलुंड भागात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 218 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा वाढता जोर पाहता भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघर, ठाणेसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन ते तीन तासांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे किंग्ज सर्कल, हिंदमाता, सायन, कूर्ला, अंधेरी सबवे आणि मिलन सबवे यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू असून अनेक मार्गांवरील वाहतूक कोंडी झाल्याचे सकाळच्या सुमारास दिसून आले. त्यामुळे वेळेत ऑफिस गाठण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत.
#WATCH | Maharashtra: Waterlogged railway tracks witnessed at Dadar Station in Mumbai as heavy rainfall continues in the city pic.twitter.com/wVVaf990it
— ANI (@ANI) July 2, 2026
मुलुंड आणि पूर्व उपनगरांना मोठा फटका
पूर्व उपनगरांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक होता. यात मुलुंड परिसराला पावसाने सर्वाधिक झोडपले असून तिथे 218 मिमी इतका विक्रमी पाऊस नोंदवला गेला आहे. याशिवाय भांडुप, नाहूर आणि घाटकोपर परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम उपनगरे आणि शहर भागातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळत आहे. मुलुंडनंतर पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे 216 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पवई येथे 208.4 मिमी पावसाची नोंद झाली.
🌧️दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते दिनांक २ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबई शहरात १३४ मिमी, पूर्व उपनगरात १६४ मिमी आणि पश्चिम उपनगरात १४९ मिमी पावसाची नोंद झाली.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे.#MyBMCUpdates #MumbaiRains pic.twitter.com/6BIctkdPmN
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 2, 2026
हवामान विभागाचा ‘रेड अलर्ट’
हवामान विभागाने मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपत्कालीन मदतीसाठी पालिकेच्या 103 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे.
#WATCH | Maharashtra | Waterlogging witnessed in parts of Mumbai city following heavy rainfall in the city.
Visuals from the Kurla East area. pic.twitter.com/5WG6JsRk9i
— ANI (@ANI) July 2, 2026
4 दिवस पाऊस धुमाकूळ घालणार
मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून 24 तासात 200 मिमी पावसाची नोंद होऊ शकते.
#WATCH | Maharashtra | Severe waterlogging witnessed in parts of Mumbai following heavy rainfall in the city.
(Visuals from SG Barve Road, Sindhi Society, Chembur) pic.twitter.com/oyvHJ6r2qm
— ANI (@ANI) July 2, 2026
#WATCH | Maharashtra | Severe waterlogging witnessed in parts of Mumbai following heavy rainfall in the city.
(Visuals from the Prabhadevi area) pic.twitter.com/4N6fbKgpnM
— ANI (@ANI) July 2, 2026





























































