आता उघड्या मॅनहोलची तक्रार व्हॉट्सअॅपवर करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर व उपनगरांतील उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोलची तक्रार आता थेट पालिकेच्या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येणार आहे. मुंबईत पालिकेच्या मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे असे एकूण 1 लाख 3 हजार 926 मॅनहोल आहेत. ऑगस्ट 2017 मध्ये परळ येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न चर्चेत येतो. उघड्या मॅनहोलच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला अनेक वेळा खडे बोल सुनावले. तरीही उघडय़ा मॅनहोलचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. गेल्या आठवड्यात साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय पादचाऱयाचा व मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.