
साहेबगंजमधील भाजपचे आमदार राजू कुमार सिंह यांना दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने महिलेच्या हत्येप्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावली. 31 डिसेंबर 2018 रोजी दिल्लीत नव्या वर्षानिमित्त पार्टीचा जल्लोष करताना केलेल्या गोळीबारात डॉ. अर्चना गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला होता. सिंह यांना हत्येप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे. या निर्णयानंतर राजू पुमार यांची आमदारकी जाऊ शकते. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर आमदारकी जाते, असा नियम आहे.






























































