
अतिवृष्टीच्या तडाख्याने पेणमधील रावे आणि तांबडशेत या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. या पुरात अडकलेल्या दोन नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलांची ‘आपदा मित्रां’च्या पथकाने रबर बोटच्या मदतीने सुखरूप सुटका केली आहे. आपदा मित्र अभिकेत म्हात्रे आणि राजेश म्हात्रे यांच्या टीमने ही मोहीम यशस्वी करत दोन्ही गर्भवती महिलांना वैद्यकीय उपचारासाठी पेण रुग्णालयात दाखल केले.



























































