
वांद्रे पूर्व गरीब नगर परिसरातील पात्र १०० झोपडीधारकांचे १५ ऑगस्टपूर्वी पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांना ३०० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. विधान परिषदेत आमदार झिशान सिद्दीकी यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.
एमपीएससी परीक्षा ऑफलाइनच घ्या!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला राज्यभरातील विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध असून, सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करून परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइनच घ्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली. ऑनलाइन परीक्षेचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
अमली पदार्थांची खुलेआम विक्री रोखा
मुंबईत कायदा व सुव्यवस्था बिघडली असून अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे आणि त्याबाबत तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जात असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे, असा आरोप शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी आज विधानसभेत केला. भायखळा विधानसभा क्षेत्रात भायखळा, डोंगरी, जे.जे. मार्ग, आग्रीपाडा आणि काळाचौकी अशा पाचही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री व सेवनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही आणि पोलिसांना पूर्णपणे माहिती असूनही कारवाई होत नाही, असे आमदार जामसुतकर म्हणाले, भायखळा पूर्व व पश्चिम विभागात अमली पदार्थांची राजरोस विक्री होत असल्यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असून हे रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी



























































