
लाइफ इन्शुरन्स घेतल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत महिलेचा मृत्यू झाला. महिलेने आपला आजार लपवला असे सांगत विमा कंपनीने या महिलेचा विम्याचा दावा फेटाळला, परंतु महिलेच्या कुटुंबीयांनी ग्राहक निवारण आयोगाकडे धाव घेताच कंपनीने या कुटुंबाला एकूण 20.25 लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाने दिले.
आंध्र प्रदेशातील या महिलेने 1 डिसेंबर 2022 रोजी 20 लाख रुपयांचा जीवन विमा खरेदी केला होता. यासाठी तिने 3122 रुपये प्रीमियम जमा केले होते. पैसे भरल्यानंतर पॉलिसी लागू झाली. महिलेने पतीला नॉमिनी केले होते. 9 डिसेंबर 2022 रोजी महिलेला अचानक हार्ट स्ट्रोक आला. यात तिचा मृत्यू झाला. पती आणि तीन मुलांनी आवश्यक कागदपत्रांसोबत विम्याचा दावा दाखल केला, परंतु महिलेनी आजाराची माहिती लपवली, असे सांगून कंपनीने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. आयोगाने विमा कंपनीला कुटुंबाला 20 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.





























































