ट्रेंड – गुडघ्याला बाशिंग…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका हॉलमध्ये लग्नाचे विधी सुरू आहेत आणि अचानक पाऊस येतो आणि संपूर्ण मांडव पाण्याने भरून जातो. व्हिडीओमध्ये सजवलेले लग्नस्थळ आणि पाहुण्यांची गर्दी दिसत आहे. नवरदेव आपल्या वधूला मंडपातून उचलून नेताना दिसत आहे. तो इतका आतुर आहे की, पाऊस थांबण्याची वाट पाहू शकत नाही. हे दृश्य पाहून वऱहाडी चकित होतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोकं भन्नाट कमेंट्स करत आहेत. @zingabad नावाच्या एका अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो ह्यूज आणि अनेक लाईक्स मिळाले आहेत. एका नेटीझनने लिहिले, ‘भाऊ नवरीला घेऊन जाण्यासाठी खूप आतुर झाला आहे.’ अन्य एकाने, ‘लाला, पाणी ओसरू दे…’ असा सल्लाही दिला आहे.