
हिंगोली, नांदेड, लातूरसह परभणी जिल्हा गुरुवारी पहाटे भूकंपाच्या लागोपाठ चार धक्क्यांनी हादरला. पहाटे 1.37 मिनिटांनी पहिला 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का बसला. त्यानंतर 2.15 मिनिटांनी दुसरा हादरा बसला. त्यानंतर लगेच 2.17 मिनिटांनी तिसरा आणि त्यापाठोपाठ 3.23 मिनिटांनी चौथा हादरा बसला. हा धक्का 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. पहिला धक्का बसताच लोक घराबाहेर आले. धक्क्यावर धक्के बसत असल्यामुळे या तीनही जिल्ह्यांतील लोकांनी रात्रा जागून काढली. दरम्यान, भूकंपामुळे काही गावांमध्ये घरांना तडे गेले, काही घरांची पडझड झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.



























































