पूर्व द्रूतगती मार्गावर विक्रोळीत पादचारी पूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पादचारी पुलाचे आज उद्घाटन करण्यात आले. प्रवीण हॉटेलच्या समोरील हा पादचारी पूल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र या नवीन पादचारी पुलामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या लोकार्पण सोहळ्यादरम्यान नगरसेविका सुनीता जाधव, विभाग संघटिका रश्मी पहुडकर, परम यादव, अभय राणे, प्रकाश पुजारी, आसावरी भोईटे, वंदना बेंद्रे व शेखर जाधव आदी उपस्थित होते.