
नीट पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांपुढे केंद्र सरकारला झुकावे लागले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी एक्सवर पोस्ट करून दिली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच संदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही एक्सवर एक पोस्ट केली आहे.
“धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. मोदी-शहा अजेय नाहीत… ते देखील जातील!”, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. या पोस्टला नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला आहे. “प्रधान गेला आहे, आता प्रधानमंत्री यांची बारी”, “झुरळ म्हणून ज्यांना हिणवलं,त्यांनीच सरकारला नमवलं”, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा;
मोदी शहा अजेय नाहीत..
ते देखील जातील! pic.twitter.com/tkAAjIk2PT— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2026
नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी करत होते. याला देशभरातूनही प्रचंड पाठिंबा मिळत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अखेर विद्यार्थ्यांच्या रेट्यापुढे सरकारला नमते घ्यावे लागले असून धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया, जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष pic.twitter.com/lfOB2cbiSC
— Saamana Online (@SaamanaOnline) July 25, 2026




























































